एसटीचे 30 हजार कामगार किमान वेतनापासून वंचित

July 21, 2011 11:12 AM0 commentsViews: 3

21 जुलै

राज्यातील तब्बल 30 हजार एसटी कामगार किमान वेतनापासून वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे इंटकप्रणित एसटी वर्कर्स काँग्रेसनंच ही बाब उघडकीस आणली. 5 वर्षांपासूर्वी एसटी महामंडळाने ड्रायव्हर, कंटक्टर, हेल्पर, स्वीपर या पदांवर 30 हजार कर्मचारी भरले.

मात्र, त्यांना ठरवण्यात आलेल्या पगारापेक्षा फारच कमी पगार देण्यात येतोय. हा पगार किमान वेतनापेक्षाही कमी असल्याची कबुली कामगार कल्याण खात्याने दिली आहे. तरीही एसटी महामंडळ मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असल्याचे इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सातत्याने पाठपुरावा करून उघडीस आणलं.

close