मनमाडमध्ये तेलभेसळीचे धागेदोरे थेट नवी मुंबईपर्यंत

July 21, 2011 2:49 PM0 commentsViews: 1

21 जुलै

मनमाडच्या तेलभेसळ प्रकरणाचे धागेदोरे थेट नवी मुंबईपर्यंत पसरल्याचे पुढे येतं आहे. वाशीचा बाबा ठाकूर टँकर्ससाठीच्या बनावट चाव्या तयार करून देत असल्याची कबुली या प्रकरणातल्या आरोपींनी पोलिसांकडे दिली. बनावट चाव्यांच्या आधारे तेलभेसळ करणारी ही टोळी मनमाड पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी उघडकीस आणली होती.

त्यात परभणीचा राजाराम भारदे आणि लासलगावचा अनिल संसारे यांचा समावेश आहे. भारदे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. सुरुवातीला टँकरचा ड्रायव्हर असलेल्या भारदेला तेलभेसळीच्या धंद्यात जास्त फायदा मिळत असल्याचे लक्षात आल्यावर त्यानंही बनावट चाव्या तयार करण्याचा धंदा सुरू केला. त्याच्या जबानीतून वाशीच्या बाबा ठाकूरचं नाव पुढे आलं. मनमाड पोलिसांनी बाबा ठाकूरचा माग काढण्याचाही प्रयत्न केला मात्र तो गायब झाला.

close