जळगाव मध्यवर्ती बँकेत शेतकरी वीमा योजनेमध्ये गैरव्यवहार

July 21, 2011 11:26 AM0 commentsViews: 46

21 जुलै

जळगावची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. शेतकरी अपघात वीमा योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार केल्याने जवळपास 105 शेतकर्‍याच्या वारसांना वीमा दिला गेला नाही त्यामुळे हा गैरव्यवहार समोर आला आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर हे या बँकेचे संचालक आहेत.

जिल्ह्यातील 2 लाख 46 हजार 914 शेतक-यांचा वीमा या बँकेनं तर काढला पण सरकारी नाही तर खाजगी कंपनीकडून. या योजनेचा लाभ रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडून मिळणं बंद झालं आणि भलत्याच गोष्टी समोर आल्या. आता तर बँकेतून या शेतकरी वीमा योजनेची महत्वाची कागदपत्रच गायब झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांची 6 सदस्यांची समिती गठीत झाली आहे.1 महिन्यात अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची भाषा सत्ताधारी करत आहेत.

close