बनावट वर्ग दाखवून शाळेनं निधी हडपला

July 21, 2011 2:32 PM1 commentViews: 13

21 जुलै

आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने शाळेच्या बनावट तुकड्या दाखवून निधी हडपल्याचा प्रकार पुढे आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला. तेलंगशी गावात 7 वी पर्यंतच शाळा आहे. त्यापुढल्या तुकड्यांना मान्यता मिळावी म्हणून ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले होते.

त्यावेळी आपल्या गावात यशवंत होळकर विद्यालयाच्या 8 वी- 9 वीच्या तुकड्या असल्याचे त्यांना पहिल्यांदाच कळलं. प्रत्यक्षात ही शाळाच तेलंगशी गावात नसताना शिक्षण खात्याकडे कागदोपत्री या तुकड्या दाखवण्यात आल्या आहेत. इतकंच नाही, तर या बनावट शाळेसाठी शिक्षण विभागाने 3 शिक्षकांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली.

त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या बनावट शिक्क्यांचा वापर केल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. वर्षभर याचा पाठपुरावा करूनही शिक्षण खातं याबाबत मूग गिळून आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भीमराव धोंडे यांची बायको दमयंती धोंडे यांच्या नावाने ही बनावट शाळा आहे.

  • sachin

    No action has been taken till today………

close