डोंबिवलीत खड्‌ड्यांवरून शिवसेना – मनसेत जुंपली

July 21, 2011 11:33 AM0 commentsViews: 2

21 जुलै

मुंबईतील डोंबिवलीत आज खड्‌ड्यांच्या मुद्यावरुन शिवसेना आणि मनसेत चांगलीच जुंपली. यावेळी संतापलेल्या महापौरांनी मनसेचे बॅनर्स फाडले. रस्त्यांवरच्या खड्डयांविरोधात मनसेनं आज डोंबिवलीत आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या महापौर वैजयंती घोलप यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते.

त्यामुळे संतापलेल्या महापौर आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी पोहचल्या. इंदिरा चौकात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजीला सुरूवात झाली. या घोषणायुद्धा दरम्यानचे संतापलेल्या महापौरांनी मनसेचा बॅनर फाडला. यावेळी सेना मनसे नगरसेवकांमध्ये बाचाबाची ही झाली.

close