शालेय शुल्क नियंत्रण विधेयक या अधिवेशनात मांडणार – राजेंद्र दर्डा

July 21, 2011 3:20 PM0 commentsViews: 3

21 जुलै

येत्या पावसाळी अधिवेशनात शालेय शुल्क नियंत्रण विधेयक मांडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज दिली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दर्डांच्या हस्ते आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी आंदोलन केल्यानंतर शालेय शुल्क नियंत्रण कायदा करण्याच्या दृष्टीने सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली. या विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी आमदारांची समिती नेमण्यात आली होती. या समितीचं काम आता अंतीम टप्प्यात आलं असून येत्या अधिवेशनात हे विधेयक मांडणार असल्याची माहिती राजेंद्र दर्डा यांनी दिली आहे.

close