बिरोबा विठ्ठल यात्रेला मेंढपाळांचा जमला मेळा

July 21, 2011 1:47 PM0 commentsViews: 71

21 जुलै

जत्रा-यात्रांचा हंगाम असतो चैत्र वैशाखातला. पण बीड जिल्ह्यातील वडवणीमध्ये बिरोबा विठ्ठलाची यात्रा भरते ती आषाढ महिन्यात या यात्रेत मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसह सहभागी होतात. वर्षभर सगळीकडे फिरून मेंढपाळ मेंढ्यांना चारा देतात. पण आषाढ महिन्यात पाहिजे त्या प्रमाणात चारा मिळत नाही.

त्यामुळे धनगर समाज आपल्या गावी परततो. सगळे मेंढपाळ एकत्र येऊन बिरोबा विठ्ठलाची यात्रा साजरी करतात. या यात्रेत कळपातल्या एका मेंढीचं दुसर्‍या कळपातल्या मेंढ्याबरोबर लग्न लावण्याची प्रथाही पूर्वीपासून आहे. या लग्नानंतर मेंढा-मेंढीची पूजा केली जाते. बिरोबाच्या मंदिराभोवती मेंढ्यांसह प्रदक्षिणा घातल्या जातात. वर्षभर सुख समृद्धी मिळू दे, असं साकडं मेंढपाळ बिरोबाला घालतात.

close