येडियुरप्पा पुन्हा अडचणीत

July 21, 2011 5:17 PM0 commentsViews: 4

21 जुलै

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. बेकायदेशीर मायनिंगप्रकरणी कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी अहवाल तयार केला. त्यात मायनिंग माफियांशी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांचे थेट संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. इतकंच नाही तर, हेगडे यांनी आपले फोन टॅप केले जात असल्याचे सांगून बॉम्बगोळा टाकला.

हा अहवाल शुक्रवारी खुला करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण त्यापूर्वीच हा अहवाल फुटला. लोकायुक्तांनी अहवालात जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावरही मायनिंग सम्राटाकडून लाच घेतल्याचा आरोप केला. लीक झालेल्या या रिपोर्टमध्ये काँग्रेसच्याही काही नेत्यांची नावं आहेत. दरम्यान, कर्नाटक हायकोर्टाने जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांना परवानगी दिली.

close