हर्षवर्धन पाटील अपघातात बचावले

July 24, 2011 8:53 AM0 commentsViews: 2

24 जुलै

संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील काल रात्री झालेल्या अपघातात सुदैवाने बचावले आहेत.बारामती मोरगाव रस्त्यावर करावाघदजवळ गाडीला हा अपघात झाला. या अपघातात हर्षवर्धन पाटील यांचा हात फ्रॅक्चर झाला आहेत. त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमीट करण्यात आलं. पाटील यांच्या गाडीला टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटीलही जखमी झाल्या. तर पाटील यांच्या गाडीचा ड्रायव्हर आणि टेम्पोचा ड्रायव्हर दोघंही जखमी आहेत. काल रात्री एक वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाला.

close