दयानंद पांडेला नाशिक कोर्टात हजर करणार

November 14, 2008 6:31 AM0 commentsViews: 5

14 नोव्हेंबर, नाशिकमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या उत्तरप्रदेशामधील दयानंद पांडे या संशयिताला एटीएसनं 13 नोव्हेंबरला मुंबईत आणलं. तसंच 14 नोव्हेंबरला पहाटेच त्याला नाशिककडे नेण्यात आलं आहे. 14 नोव्हेंबरलाच दयानंद पांडेला नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे.जम्मूतल्या शारदा सर्वज्ञ पीठाचा शंकराचार्य दयानंद पांडे हा अमरनाथ आंदोलनातही आघाडीवर होता. पांडेचा वावर देशभर होता तसंच आपल्या कारवाया पार पाडण्यासाठी तो निवृत्त लष्करी अधिकार्‍यांची नेमणूक करायचा, असंही आता तपासात उघड झालं आहे.

close