गायब नवले उपोषणाला बसणार

July 24, 2011 9:20 AM0 commentsViews: 37

24 जुलै

पवन गांधी ट्रस्ट फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेले आणि गेले अनेक दिवस बेपत्ता असलेले सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवले हे अखेर मीडियासमोर आले. आयबीएन लोकमतशी बोलताना त्यांनी पवन गांधी ट्रस्टकडून आपली फसवणूक झाल्याचा उलट आरोप केला.

शिवाय पोलिसांवरही लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला. आपल्या ठेवण्यात आले आरोप खोटे आहेत याप्रकरणात पोलिसांशी आणि राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून आपल्या बदनाम करण्याचा कट रचला आहे असा आरोप नवले यांनी केला.

मारूती नवले अटक टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि भाजपने याप्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणी आता मारुती नवले स्वत:च चक्क उपोषणाला बसणार आहेत. मारुती नवले यांनी आता सिंहगड शिक्षण संस्थेंचे मुख्य संचालक प्रकाश पाटील यांच्यामार्फत सारवासारव करुन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

पाटील यांनी नवले यांच्यावरील सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर जोशी आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात विधानभवनाबाहेर नवले उपोषणाला बसणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

पवन गांधी ट्रस्ट फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले हे अटक टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या कारवाईने नवलेंचे धाबे दणाणले आहेत. भाजपच्या एकनाथ खडसेंपाठोपाठ शिवसेनेच्या नीलम गोर्‍हेंनीही याप्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे उघड गुपीत आहे असा आरोप केला.

पुण्यातील सिंहगड संस्थेचे संस्थापक शिक्षणसम्राट हे सध्या अटक टाळण्यासाठी चक्क गायब झाले आहेत. 20 जुलै रोजी नवलेंविरोधात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आणि नवले एकाएक नॉट रिचेबल झाले.

पोलीस नवलेंच्या मागावर आहेत पण नवले बेपत्ता झालेत. नवलेंनी पोलिसांना आपण बाहेरगावी असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली आहे. तसेच वकिलांमार्फत पोलिसांना पत्र पाठवून गुन्हा रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केल्याने अटक करू नये अशी विनंतीही केली.

नवलेंना खरोखरच अटक होणार का असा प्रश्न पवन गांधी ट्रस्टच्या सदस्यांनी विचारला होता. राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय नवले असले उद्योग करू शकणार नाहीत असं विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसेंनी म्हटलं होतं. शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हेंनीही नवलेंना राजकीय अभय असल्याचं म्हटलं आहे.

नवलेंच्या दोन सहकार्‍यांनी कोर्टातून तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला. पण नवलेंनी अजून असा प्रयत्न केलेला नाही. त्यांची सगळी भिस्त आहे ती हायकोर्टाच्या सुनावणीवर. यामुळे नवले आणखी काही दिवस तरी गायब राहणंच पसंत करणार हे स्पष्ट आहे.

close