ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये पुण्याच्या दीपककुमारची बाजी

July 24, 2011 10:52 AM0 commentsViews: 7

24 जुलै

ठाण्यात आयोजित केलेल्या 22 व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आज पार पडली. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये जवळजवळ 30 हजाराहून स्पर्धकांनी भाग घेतला. ही मॅरेथॉन एकूण 9 वेगवेगळ्या गटात होती. पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुण्याच्या दीपककुमारने पहिला नंबर पटकावला.

तर नागपूरचा शशिकांत शर्माने दुसरा आणि ठाण्याचा ब्रिजलाल बिंदने तिसरा नंबर पटकावला आहे. तर महिलांच्या 15 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकची मोनिका अत्रेनं बाजी मारली. तर उरणची सुप्रिया पाटील दुसरी आणि कोल्हापूरच्या मीनाक्षी पाटीलने तिसरा नंबर पटकावला आहेत.

आज सुट्टीच्या दिवशी ठाण्यात वर्षा मॅरेथॉनचा फिव्हर होता. वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक, सकाळपासून मॅरेथान चौकात जमत होते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरवात केली.

आणि लहान – मोठे सगळेच मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले. स्पर्धकांना चिअरअप करण्यासाठी ठाणेकरांनीही एकच गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांनीही भाषणबाजी न करता मॅरेथॉनमध्ये भाग घेत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

मुख्य 21 किलो मीटरच्या मॅरेथॉनमध्ये गतविजेत्या दिपक कुमारनंच सलग दुसर्‍यांदा अव्वल क्रमांकाचा मान पटकावला. तर कोल्हापूरच्या परशराम भोई आणि ठाण्याच्या शशिकांतने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

महिलांसाठी असलेल्या दहा किलोमीटरमध्ये नाशिकच्या मोनिका अत्रेनं बाजी मारली. तीनं 1 तास, 2 मिनिटं आणि 8 सेकंदाची वेळ नोंदवली. तर अठरा वर्षाखालील मुलांसाठी असलेल्या 10 किलोमीटर गटात प्रकाश खंबाल पहिला आला.

स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरले ते ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह बघण्यासारखा होता. खारेगावमधील श्रीधर धोंडियाल यांनी पुरुष गटात तर ठाण्यातल्या सुनंदा देशपांडे यांनी जेष्ठ नागरिकांच्या महिला गटात बाजी मारली.

ज्येष्ठ नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. पण या स्पर्धकांना हुरहुर लावली ती पावसाने. पावसाने दडी मारल्याने स्पर्धकांचा थोडा हिरमोड झाला तरी स्पर्धकांमधला उत्साह मात्र कमी झाला नाही.

close