एलपीजी गॅसचा काळाबाजार करणारे रॅकेट अटकेत

July 24, 2011 10:59 AM0 commentsViews: 41

24 जुलै

पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलचा काळाबाजार होतो या घटना आता नव्या नाहीत. इंदापूर तालुक्यातील घागरगाव इथं घरघुती म्हणजे एलपीजी गॅसचा काळाबाजार करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. तसेच 1 कोटी 10 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. यात तीन टँकर, 69 रिकामे सिलेंडर आणि पिक-अप व्हॅनचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. यात स्थानिक ढाबा चालक सचिन कोकणे हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहेत.

close