मोदींचे कौतुक करणारे दारुल उलूमचे कुलगुरू निलंबित

July 24, 2011 11:09 AM0 commentsViews: 3

24 जुलै

दारुल उलूम देवबंद विद्यापीठाचे कुलगुरू गुलाम वस्तानवी यांना अखेर निरोपाचा नारळ देण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची फेब्रुवारी महिन्यात स्तुती केल्याप्रकरणी अडचणीत आले होते. मजलीस ए शूराच्या आज झालेल्या बैठकीत वस्तानवी यांना पदावरुन काढण्यात आलं. त्यांच्याविरोधात शूराच्या आठ सदस्यांनी मतदान केलं. आपल्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना वस्तानवी यांनी सांगितले की आपल्या बाजूने पाच जणांनी मत दिलं आणि चौकशी समितीला सादर केलेला अहवाल अपूर्ण असल्याने मला तो मान्य नाही. तसेच विद्यार्थी माझ्या बाजूने असल्याचंही त्यांनी म्हटलं.

close