विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नी घंटानाद आंदोलन

July 25, 2011 9:30 AM0 commentsViews: 1

25 जुलै

कायम विना अनुदानित शाळांना अनुदानित करण्यासाठी आणि शिक्षकांच्या इतर मागण्या सरकार पुढे मांडण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरातील शाळांमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आलं.महाराष्ट्रातील 40 हजार शाळांमध्ये एकाच वेळी म्हणजे सकाळी 11 वाजता एक मिनीट घंटा वाजवून हे आंदोलन करण्यात आलं. शाळांना वेतनेत्तर अनुदान द्यावे. शाळांचा वीज दर कमी करावा. शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा. शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची भरती पुन्हा सुरु करावी अशा मागण्या या आंदोलनातून सरकार पुढे मांडण्यात आली.

close