ब्राह्मण,मराठा समाजालाही आरक्षण द्या – रामदास आठवले

July 25, 2011 9:47 AM0 commentsViews: 10

25 जुलै

ब्राह्मण आणि मराठा समाजाला 25 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी केली आहे. ब्राह्मण आणि मराठा समाजात असणार्‍या गरिबांनाही आरक्षण मिळावे अशी मागणी आठवले यांनी केली. आठवले यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. अलीकडेच आठवले यांनी युतीशी हातमिळवणी करून शिवशक्ती – भीमशक्तीचा नारा दिला आहे. या महायुतीची घोषणा ऑक्टोंबर महिन्यात होणार आहे. मात्र येत्या 1 ऑगस्टला आपण एनडीएत प्रवेश करणार आहोत अशी माहिती ही आठवले यांनी दिली तसेच येणार्‍या निवडणूकांंमध्ये राज ठाकरेंचा प्रभाव दिसणार नाही असा दावा ही आठवले यांनी केला.

close