राजकोट वन डे मध्ये भारताची स्थिती मजबूत

November 14, 2008 7:03 AM0 commentsViews: 3

14 नोव्हेंबर, राजकोटराजकोट इथल्या पहिल्या वन डे मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिली बॅटिंग करताना भारताने मोठ्या स्कोअरच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्रेचाळीसाव्या ओव्हरमध्येच भारताचे 300 रन्स पूर्ण झाले आहेत.इंग्लंडने टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग दिली. पण सकाळच्या दवाचा फायदा त्यांच्य बॉलर्सना उटवता आला नाही. सेहवाग आणि गंभीरने सहाच्या रनरेटने रन करत भारताला सेंच्युरी ओपनिंग करुन दिली. त्यानंतर मात्र दोघेही एकामागोमाग आऊट झाले. गंभीरने 51 तर सेहवागने 85 रन्स केले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी फटकेबाजी सुरू ठेवली. तिसर्‍या विकेटसाठी दोघांनी 87 रन्सची पार्टनरशिप केली. रैना ऐन रंगात आलेला असताना आऊट झाला. त्याने 43 रन्स केले. युवराज सिंगने मात्र आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. भारतीय बॅट्समननी या मॅचमध्ये सिक्सची बरसात केली. चाळीसाव्या ओव्हर पर्यंतच त्यांनी नऊ सिक्स मारले.

close