महापालिका आयुक्तांना ज्यादा अधिकारबद्दल महापौरांचा आक्षेप

July 24, 2011 3:36 PM0 commentsViews: 6

24 जुलै

राज्यातील महापालिकांचा कारभार अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी राज्यशासनाने महापालिका आयुक्तांना ज्यादा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. परंतू या निर्णयाला विरोध करत सर्व महापालिकेतील महापौर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहेत. महापालिका आयुक्तांना देण्यात येणार्‍या ज्यादा अधिकारांचा गैरवापरच जास्त होण्याची शक्यता असल्याचे त्यांना वाटत आहे.

हे ज्यादा अधिकार म्हणजे लोकशाहीवर गदा आहे असे ज्यादा अधिकार देऊन सरकारला काय सिद्ध करायचंय असा सवाल पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल यांनी विचारला. तर आयुक्त हे त्या त्या महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या हातातील बाहुलंच आहे त्यामुळे ते विरोधक नगरसेवकांवर मनमानी पद्धतीने कारवाई करण्याचीच भीती विरोधी नगरसेवकांनी व्यक्त केली.

येत्या अधिवेशनात आयुक्तांना ज्यादा अधिकार देण्याचा प्रस्ताव सभागृहात ठेवला जाणार आहे. तो पारीत झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला.

close