गिरणी कामगारांच्या वारसांना घरांची लवकरच घोषणा

July 25, 2011 10:33 AM0 commentsViews: 2

25 जुलै

गिरणी कामगारांच्या घरासंदर्भातील काही महत्वाच्या निर्णयांची घोषणा येत्या एक ते दोन दिवसात पावसाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या आमदारांची बैठक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत आमदारांबरोबर चर्चा केल्यानंतर काही निर्णय घेण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी महत्वाचा निर्णय म्हणजे सध्या उपलब्ध असलेली घरं लॉटरी पद्धतीने गिरणी कामगारांना वितरीत केली जाणार आहेत. त्याच बरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा झालेल्या गिरणी कामगारांच्या वारसांना प्राधान्याने घरं दिली जाणार आहेत. येत्या एक दोन दिवसात याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकते.

या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत चर्चा झाली. मात्र तोडगा निघू शकलेला नाही. पण मुंबईतल्या आमदारांनी घराच्या किंमती कमी करण्याबाबत सर्वाधिक भर दिला. गिरणी कामगारांच्या वारसांना घरं, 1 जानेवारी 1982 ला हजेरीपटावर असलेल्या सगळ्या गिरणी कामगारांना घरं आणि ज्या गिरणी कामगारांचे मुंबईत घर आहे त्यांना या योजनेअंतर्गत घरं मिळणार का याबाबतचा निर्णयही मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार आहेत.

close