नॉर्वेत झालेल्या स्फोटात मृतांची संख्या 93

July 24, 2011 4:31 PM0 commentsViews: 6

24 जुलै

नॉर्वेची राजधानी ओस्लोत शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांची संख्या 93 झाली आहे. या प्रकरणी अटक केलेला संशयित अंडर्स ब्रेहविक याने स्फोटाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या डायरीतूनही याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहेत. त्यानुसार अंडर्स या स्फोटाची तयारी 2009 सालापासून करत असल्याचे समोर आलं. अँडर्स बेहरिंग ब्रेव्हिक असं त्याचं नाव आहे. तो एका ख्रिस्ती कट्टरवादी गटाचा सदस्य आहे. ओस्लो इथल्या पंतप्रधान जेन्स स्टोल्टनबर्ग यांच्या इमारतीबाहेर बॉम्बस्फोट केल्याचा आणि त्यानंतर बेछूट गोळीबार केल्याचे त्यांनं मान्य केलं.

close