राष्ट्रवादीच्या सरचिटणीसांनी घेतली शाहीद बलवाची भेट

July 25, 2011 10:41 AM0 commentsViews: 5

25 जुलै

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी यांनी 2 जी घोटाळ्यातील आरोपी शाहीद बलवा आणि विनोद गोयंकाची भेट घेतली. शाहिद बलवा आणि विनोद गोयंका हे दोन्ही उद्योगपती शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. असा आरोप या अगोदर झाले आहेत.

त्यामुळे त्रिपाठींनी घेतलेल्या भेटीमुळे आता वेगळीचं चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान विनोद गोयंका हे आपले मित्र आहेत.आणि एक नागरिक म्हणून त्यांची भेट घेतली राष्ट्रवादीचा नेता म्हणून नाही.असं स्पष्टीकरण डी.पी.त्रिपाठींनी दिलं. दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात त्रिपाठी यांनी बलवा आणि गोयंका यांची भेट घेतली.

close