गोंदियात राईस मिलमध्ये काळाबाजार उघड

July 25, 2011 7:37 AM0 commentsViews: 39

25 जुलै

गोंदिया जिल्ह्याच्या श्री दादीजी राईस मिलच्या काळाबाजाराचा पर्दाफाश झाला आहे. बाहेरून बंद दिसणार्‍या या मिलमध्ये राज्याच्या इतर जिल्ह्यांमधून तसेच मध्यप्रदेशातून 'एफसीआय'चा तांदूळ येतो. या तांदळाच्या गोण्यांमध्ये घोळ करून पुन्हा त्या एफसीआयला देण्याचा काळाबाजार या मिलमध्ये होतोय. गोंदिया जिल्ह्यात अश्याच प्रकारे अनेक राईस मिलमध्ये काळाबाजार सुरू आहे. आयबीएन लोकमतने या मिलच्या काळाबाजाराचे चित्रिकरण केल्यानंतर रावणवाडी पोलिसांनी मिलवर कारवाई केली.

close