अर्थमंत्र्यांना हवी जागतिक बँकेची मदत

November 14, 2008 7:24 AM0 commentsViews: 5

14 नोव्हेंबरअर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात जागतिक बँकेने भारतालाही मदत करावी, अशी मागणी केली आहे. विशेषत: भारतातल्या विकासकामांसाठी आवश्यक ती मदत मिळावी, अशी अपेशा त्यांनी व्यक्त केली. अर्थमंत्री पी चिदंबरम आणि पंतप्रधान मनमोहन सिंग वॉशिंग्टन इथं होणार्‍या ' जी-20 ' राष्ट्रांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. त्यावेळी या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

close