राष्ट्रपतींनी केली संपत्ती जाहीर

July 25, 2011 1:45 PM0 commentsViews: 2

25 जुलै

सर्व मंत्र्यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपली संपत्ती जाहीर करावी असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. पण देशाच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपली संपत्ती जाहीर करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या संपत्तीत अमरावतीमध्ये त्यांचं 39 लाख रुपयांचं घर आहे.

10 लाख रुपयांचे फार्म हाऊस आणि जळगावमध्ये 34 लाख रुपयांची 8 हेक्टर जमीन आहे. शिवाय अडीच कोटी रुपयांचे शेअर्स आणि दागिने आहेत. आपल्याकडे 1 लाख 9 हजार रुपयांची रोख रक्कमही असल्याचे प्रतिभा पाटील यांनी म्हटलं. संपत्ती जाहीर करणार्‍या प्रतिभा पाटील या पहिल्याच राष्ट्रपती ठरल्या आहे. राष्ट्रपतींवर संपत्ती जाहीर करण्याचं बंधन नसतं. तरीही राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपली संपत्ती जाहीर केली.

close