भिवंडीत कचर्‍याविरोधात मनसेचे आंदोलन

July 25, 2011 1:54 PM0 commentsViews: 3

25 जुलै

भिवंडी महानगर पालिकेच्या आवारात शहरातील कचर्‍याविरोधात आज मनसेनं आंदोलन केलं. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. मनसे कार्यकर्त्यांनी डॅपर भरुन कचरा महापालिकेच्या आवारात टाकला.

मुख्य कार्यालयाच्या गेटवरच कचरा टाकल्याने महापालिकेच्या कामगारांची एकच धावपळ उडाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कचरा फेकून घोषणाबाजी केली. शहरातील कचरा लवकरात लवकर उचलावा असा महापालिकेला सज्जड दम दिला. महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्ष्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचा मनसैनिकांनी आरोप केला. या आंदोलनानंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला.

close