आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : दलित सरपंचाला मिळणार सर्व सुविधा

July 25, 2011 2:00 PM0 commentsViews: 15

25 जुलै

हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीच्या सभापती शोभा खिल्लारे दलित असल्याच्या कारणावरुन त्यांच्याशी दुजाभाव केला जातो ही बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. या बातमीची दखल सेनगावच्या जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बशीर पटेल यांनी घेतली. बशीर पटेल यांनी गटविकास अधिकार्‍यांना आदेश देऊन सभापतींची सर्व कामं पूर्ण करण्याचे आणि त्यांना सर्व सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधित सर्व अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले आहे.

close