ऐतिहासिक कसोटीत भारताचा दारूण पराभव

July 25, 2011 5:31 PM0 commentsViews: 2

25 जुलै

ऐतिहासिक लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडने भारताचा 196 रन्सने दणदणीत पराभव केला. इंग्लंडच्या भेदक बॉलिंगसमोर भारतीय टीम 261 रन्सवर ऑलआऊट झाली. या विजयाबरोबरच इंग्लंडने सीरिजमध्येही 1-0 अशी आघाडी घेतली. भारत आणि इंग्लंडदरम्यानची ही शंभरावी आणि टेस्ट क्रिकेटमधील ही दोन हजारवी टेस्ट मॅच असल्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या मॅचवर लागलं होतं.

ही मॅच पाहण्यासाठी लॉर्ड्सचे स्टेडिअमही हाऊसफुल होतं. 458 रन्सचे बलाढ्य टार्गेट समोर ठेऊन खेळणार्‍या भारतीय टीमची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. राहुल द्रविड, गौतम गंभीर, व्ही व्ही एस लक्ष्मण ही भारताची भक्कम वाटणारी बॅटिंग ऑर्डर लॉर्ड्स टेस्टमध्ये मात्र अपयशी ठरली.

सचिन तेंडुलकरचे लॉर्ड्सवर सेंच्युरी करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं. सुरेश रैनाने एकाकी झुंज देत 78 रन्स केले. पण टीमचा पराभव मात्र तो टाळू शकला नाही. भारतावरच्या या ऐतिहासिक विजयानंतर इंग्लंडच्या टीमने एकच जल्लोष केला.

close