मनसे आमदारांनी दाखवलं गृहराज्यमंत्र्यांचं बनावट पॅन कार्ड

July 26, 2011 2:31 PM0 commentsViews: 19

26 जुलै

बॉम्बस्फोटाच्या चर्चेदरम्यान बाळा नांदगावकर यांनी विधीमंडळात चक्क गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचंच बोगस पॅनकार्ड सादर केलं. मुंबईत सीबीडी बेलापूर इथून केवळ 400 रुपयांना हे बोगस पॅनकार्ड बनवून मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे कुठेही बनावट ओळखपत्रं बनवून मिळतात. त्याचा फायदा परप्रांतियांबरोबरच दहशतवादीही उठवतात, त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबईसाठी परमिट पद्धतीची केलेली मागणी योग्यच असल्याचं त्यांनी सांगितलं.

close