राजा यांनी डागल्या आरोपांच्या फैरी

July 26, 2011 2:57 PM0 commentsViews: 13

26 जुलै

2 जी घोटाळ्याप्रकरणी राजा यांनी चौफेर तोफ डागली. चिदंबरम यांना साक्षीदार बनवण्याची मागणी केली, तर हा खटलाच अन्यायकारक असल्याचा राजांच्या वकिलांनी न्यायाधीशांवर आरोप केला.

दुस-या दिवसाच्या सुरवातीलाच ए राजा यांनी कोर्टात स्पष्टीकरण दिलं की ते पंतप्रधान आणि चिदंबरम यांना या केसमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत नाहीत. मीडियाने चुकीच्या बातम्या दिल्या असं राजा म्हणाले. पण पुढच्याच क्षणाला ते पुन्हा आक्रमक झाले आणि चौफेर आरोपांच्या फैरी झाडू लागले.

राजांच्या आरोपांच्या फैरी

टार्गेट 1 – CAG

राजांनी सुरवात केली. भारताचे महालेखापरीक्षक अर्थात CAG यांच्यापासून. CAG विनोद राय हे कायदेशीर बाबींत निरक्षर असून केवळ एक अकाउंटंट आहेत. गुन्हेगारी कायद्यात त्यांच्या अहवालाला कोणतेही स्थान नाही.

टार्गेट 2 – विशेष न्यायाधीश ओ पी सैनी

ए राजांचे वकील सुशील कुमार यांनी थेट न्यायाधीश ओ पी सैनी यांच्यावरच अन्यायकारक पद्धतीनं खटला चालवत असल्याचा आरोप केला. ते न्यायाधीशांना म्हणाले, 'तुम्ही 6 महिन्यापांसून केवळ कागदपत्रं तपासत आहात. तुम्हाला ही केस ऐकण्याचा पगार मिळतो. पण माझ्याकडे इतरही खटले आहेत. ते सर्व सोडून मी इथंच बसून राहू का?' सुप्रीम कोर्टाला टोला मारत राजांचे वकील म्हणाले, 'राजांना जामीन द्यायचा की नाही, हे तुम्ही इतर कोर्टांना का ठरवू देताय?'

टार्गेट 3 – पी चिदंबरम

दुस-या दिवशी पुन्हा चिदंबरम यांच्या निशाणा साधत राजांचे वकील म्हणाले की स्वॉन आणि युनिटेक या लाभार्थी कंपन्यांच्या विक्रीला चिदंबरम यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे त्यांना कालांतराने कोर्टात साक्षीदार म्हणून यावंच लागेल.

टार्गेट 4 – पंतप्रधान, कायदा मंत्री

राजा म्हणाले की स्पेक्ट्रम वाटप करताना मंत्रिगटाला अंधारात ठेवल्याचा माझ्यावर आरोप आहे. पण या संदर्भातली फाईल कायदा मंत्री आणि पंतप्रधान यांच्या नजरेखालून नोव्हेंबर 2007 मध्ये गेली होती. जर त्यांना त्या फाईलमध्ये काही गैर अढळलं, तर त्यांनी ती मंत्रिगटाकडे का पाठवली नाही. मग तुम्ही असं म्हणाल का की कायदा मंत्रीसुद्धा माझ्या कटात सहभागी होते?

close