..तर ‘आरक्षण’ चित्रपटाला विरोध – छगन भुजबळ

July 27, 2011 11:00 AM0 commentsViews: 5

27 जुलै

आरक्षण हा प्रकाश झा यांचा हिंदी चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटाला राजकीय नेत्यांकडून विरोध होतोय. रामदास आठवले यांच्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही या चित्रपटाला विरोध केला. हा चित्रपट जर आरक्षणाच्या विरोधात असेल तर त्याला विरोध करू असा इशाराही भुजबळांनी दिला. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाच्या विरोध जर चित्रपट करत असेल त्याला विरोध होईलच असंही भुजबळांनी म्हटलं.

close