बोरगाव जळीतकांड प्रकरणी 27 आरोपींना 7 वर्ष सक्तमजुरी

July 27, 2011 11:55 AM0 commentsViews: 4

27 जुलै

बोरगाव जळीतकांडाप्रकरणी 27 आरोपींना 7 वर्ष सक्तमजूरी आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहेत. सांगलीतल्या कवठेमहाकाळ तालुक्यातल्या बोरगावमध्ये 15 सप्टेंबर 1998 ला दलित युवकाने सवर्ण मुलीला पळवून नेल्यामुळे सवर्णीयांनी चिडून दलितांची 48 घरे जाळली होती. याप्रकरणी 128 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 12 वर्षानंतर लागलेल्या निकालात 27 आरोपींना 7 वर्ष सक्तमजूरी आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर 77 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

close