जालना गोळीबार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी !

July 27, 2011 4:53 PM0 commentsViews: 1

27 जुलै

जालन्यात झालेल्या वारकर्‍यांच्या अपघाताचा मुद्दा आज विधानसभा आणि विधानपरिषदेत चांगलच गाजला. अपघातानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार आणि गोळीबाराच्या प्रकरणावर चर्चा झाली. पोलीस गोळीबाराची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले.

तसेच मृतांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये मदत वाढवून देण्याचे आश्वासनही दिलं. पण तेवढ्यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. अखेर मदत वाढवून देण्यासाठी उद्या पुन्हा बैठक होईल असं आर. आर. पाटील यांनी सांगितलं. तरीही विरोधकांचा गोंधळ कमी झाला नाही. गृहखात्याने संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली. पण गृहमंत्र्यांनी, यात पोलिसांचा काहीच दोष नाही अशी भूमिका घेतली.

close