भारत-पाक क्रिकेट सामने पुन्हा सुरू करावे – रब्बानी

July 27, 2011 12:00 PM0 commentsViews: 5

27 जुलैभारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि पाकिस्तानच्या तरुण परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्यातली ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत कोणत्याही मुद्द्यावर ठोस निर्णय झाला नाही. पण, दोन्ही देशांमधली चर्चा प्रक्रिया पुढे नेण्यावर एकमत झालं.

भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅचेस पुन्हा सुरू व्हाव्यात अशी मागणी हिना रब्बानी खार यांनी केली. भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर भर दिला. 26/11 हल्ल्याच्या तपासात काय प्रगती झालीय याचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

तर, हिना रब्बानी यांनी समझौता बॉम्बस्फोटाच्या तपासातल्या प्रगतीचा मुद्दा उपस्थित केला. हिना रब्बानी खार यांनी मंगळवारी दिल्लीत येताच फुटिरतावादी हुरियत नेत्यांची भेट घेतली होती. त्यावर भारताने नाराजी व्यक्त केली. पण हिना रब्बानी खार यांनी मात्र या भेटीचं समर्थन केलं.

close