शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

July 27, 2011 10:10 AM0 commentsViews: 9

27 जुलै

शालेय विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा एक अमानुष प्रकार समोर आला. नांदेड कीनवट रोडवर दुधगाव शाळेतील विद्यार्थांना शिक्षकाने वेळूच्या काठीने मारहाण केली. पहिली ते सहावीमधील 15 विद्यार्थांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या पाठीवर मारल्याचे वळ स्पष्टपणे दिसत आहेत. मारहाण करणार्‍या शिक्षकाच नाव कौस्तुभ मुनेश्वर असं आहे. यावेळी संतापलेल्या गावकर्‍यांनी शाळा बंद पाडली. गावकरी किनवट पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन पोहचलेत. गावकर्‍यांनी शिक्षकालाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत.

close