‘सिंघम’ची बॉक्स ऑफिसवर गर्जना

July 27, 2011 1:48 PM0 commentsViews: 3

सोमेन मिश्रा, मुंबई

27 जुलै

गेल्या आठवड्यात रोहित शेट्टीचा सिंघम सिनेमा रिलीज झाला. नेहमी विनोदी सिनेमा देणार्‍या रोहित शेट्टीने वेगळा प्रयोग करू पाहता अजय देवगणला घेऊन 'सिंघम' सिनेमा प्रेक्षकांसमोर ठेवला. प्रेक्षकांना ही या ऍक्शनपटाला पंसती दिली. पण या सिनेमाचं खरी बोली ठरली ती बॉक्स ऑफिस रिपोर्टवर.

'सिंघम'च्या रिलीज आधीच सिनेमाची खूप हवा तयार झाली होती. तामिळ सिनेमाचा रिमेक, अजय देवगणची भूमिका, अजय-अतुलचं संगीत आणि भरपूर मराठी कलाकार. बर्‍याच दिवसांनी ऍक्शनपट रिलीज झाला आणि सिनेमाचे ओपनिंग मल्टिप्लेक्सला झालं 50 ते 60 टक्के. तर सिंगल स्क्रीनला 80 ते 90 टक्के.

बॉक्स ऑफिस ओपनिंगसिनेमा – सिंघममल्टिप्लेक्स – 50-60%सिंगल स्क्रीन – 80- 90%

शुक्रवारी सिनेमाचे ओपनिंग झालं 9 कोटी. शनिवारपर्यंत ते पोचलं 9.67 कोटी आणि रविवारी तर ते वाढलं. तीन दिवसांचा गल्ला जमला 31 कोटींचा. रेडीनंतरचे हे सर्वात मोठं ओपनिंग आहे. पण समीक्षकांनी सिनेमाला फार स्टार्स दिले नाहीत.

सीएनएन आयबीएन * * हिंदूस्थान टाईमस् * 1/2 इंडियन एक्सप्रेस * *

दुसर्‍या आठवड्यातही जिंदगी ना मिलेगी दोबारा चांगला चालला. आतापर्यंत या सिनेमाने 12 कोटींचा व्यवहार झाला. जिंदगी हळूहळू सुपरहिटकडे चालली आहे.

close