आयएमएस योजना फसवणुकीत आरोपी मोकाट ; सभासद हवालदिल

July 27, 2011 8:26 AM0 commentsViews: 6

27 जुलै

तब्बल 4 हजार सभासदांची फसवणूक करणारी भगूरमधील इमू पालन आणि आयएमएसची योजना. दामदुप्पट करुन मिळेल, असं सांगत सभासदांची फसवणूक करण्यात आली. गुन्हे दाखल झाले, आरोपी अटक झाले आणि जामिनावर सुटलेही. सामान्य गुंतवणूकदार मात्र अजूनही पोलीस स्टेशनच्या चकरा मारत आहेत. नाशिकमधील या इमू आणि आयएमएस योजनेचा मुख्य सूत्रधार हेमंत दीक्षित फरार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 35 जणांना अटक केली. त्यापैकी 31 जण जामिनावर सुटलेही. जवळजवळ 1 हजार कोटींच्या घरात या फसवणुकीची रक्कम जात असूनही नाशिक-देवळालीच्या एकाही आमदाराने याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला नाही.

close