जिल्हा परिषदेत शालेय पोषण आहार योजना खंडित

July 27, 2011 12:02 PM0 commentsViews: 61

27 जुलै

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती थांबावी या उद्देशाने शालेय पोषण आहाराची योजना सुरू करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात या योजनेलाच गळती लागली. नाशिक जिल्ह्यात मनमाडसह नांदगावमध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यात गेल्या 6 महिन्यांपासून शालेय पोषण आहारासाठी तांदळाचा पत्ता नाही. शाळांनी दर महिन्याला तांदूळाची मागणी नोंदवली आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्ह्यातल्या ठेकेदारांना या तांदळाचा पुरवठा होतो. पण मग तो शाळांपर्यंतच पोहोचत नसल्याचे उघड झाले.

close