अवैध वाळू उपसा करणारे 17 जण ताब्यात

July 27, 2011 2:15 PM0 commentsViews: 3

27 जुलै

ठाण्यातील खारेगाव मुंब्रा खाडी परिसरात अवैध वाळू उत्खनन करणार्‍या कामगारांवर महसूल विभागाने कारवाई केली.परवाना संपल्यानंतरही इथं वाळू उत्खनन सुरू होतं. महसूल विभागाने या कारवाईत 3 ड्रेझर, 5 बार्जेससह 17 कामगारांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.चार महिन्यांपूर्वीही याच परिसरात महसूल विभागाने कारवाई केली होती. त्यात 15 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत 10 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मालाचे मालक मात्र अजूनही मोकाटच आहेत.

close