…तर 1 ऑगस्टला मुंबई बंद – उद्धव ठाकरे

July 28, 2011 11:00 AM0 commentsViews: 14

28 जुलै

गिरणी कामगारांच्या घरांसाठी आज घोषणा झाली नाही तर येत्या 1 ऑगस्टला मुंबई बंद करा असं आवाहन शिवसेनेनं केलं आहे. आझाद मैदानात मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेत बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केलं.

सरकार कुचकामी आहे वेळोवेळी फक्त घोषणाच झाल्या प्रत्यक्ष कारवाई नाहीच. त्यामुळेच आता घर मिळणे हा प्रत्येक गिरणी कामगाराचा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे असही उद्धव यांनी म्हटले. सभेच्या ठिकाणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, भाजपचे विनोद तावडे आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांचीही उपस्थिती होती.

गिरणी कामगारांच्या मागण्या

1. मृत गिरणी कामगारांच्या वारसांना मुंबईत घर मिळावे2.1 जाने.1982 ला हजेरीपटावर असणार्‍या प्रत्येक गिरणी कामगाराला मुंबईत घर3.ज्या गिरणी कामगाराचे मुंबईत घर आहे त्यालाही मुंबईत घर मिळावे4. गिरणी कामगारांना परडवणार्‍या किंमतीत घरं द्यावीत 5.गिरण्यांच्या जागी उभ्या राहणार्‍या उद्योगांमध्ये गिरणी कामगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे

close