गिरणी कामगारांच्या महामोर्चा आझाद मैदानात धडकला

July 28, 2011 10:08 AM0 commentsViews: 2

28 जुलै

गेली अनेक वर्ष आपल्या मागण्यांसाठी लढणार्‍या गिरणी कामगारांनी आज मुंबईत महामोर्चा काढला. हा विराट मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला. या मोर्चात गिरणी कामगारांच्या सगळ्या संघटना सहभागी झाल्या होत्या. कामगारांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच रिपाईचे रामदास आठवले या मोर्चात सहभागी झाले होते.

घरांच्या किंमती गिरणी कामगारांना परवडण्याजोग्या ठेवाव्यात ही गिरणी कामगारांची मुख्य मागणी आहे. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून या मोर्चाची सुरूवात झाली. हा मोर्चा आझाद मैदानापर्यंत पोहोचला. तिथं विराट सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेत गिरणी कामगारांच्या या लढाईची पुढची रणनिती ठरवली जाणार आहे. प्रचंड संख्येने या मोर्चात कामगार सहभागी झाले होते.

close