मी पूर्णपणे तंदुरुस्त – कलमाडी

July 28, 2011 12:09 PM0 commentsViews: 4

28 जुलै

आपली तब्येत तंदुरूस्त असून आपल्या आजाराच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा सुरेश कलमाडी यांनी केला.कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी कलमाडी सध्या तिहार जेलमध्ये आहेत. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात येणार आहे. मेंदु आणि ह्रदयाची तपासणी करण्यासाठी त्यांना एक ऑगस्ट पासून दाखल करण्यात येणार आहे. हॉस्पिटल मध्ये कलमाडी न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत. वैद्यकीय तपासणी करण्यांसदर्भात स्थापन समितीने हा निर्णय दिला आहे

रविवारी कलमाडी यांच्यावर दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये एमआरआय स्कॅन करण्यात आलं. टेस्टमध्ये कलमाडींना डेमेन्शियाचा म्हणजे स्मृतीभ्रंश झाल्याचा त्रास होत असल्याचे दिसून आलं. पण पूर्ण निदान केल्यावरच नेमकं काय ते समजेल असं तिहार जेलचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आर. एन. शर्मा यांनी सांगितले होते.

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटक होण्यापूर्वीच म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून कलमाडींना हा त्रास होत असल्याचा दावा त्यांचे वकील हितेश जैन यांनी केला. कलमाडींच्या या आजाराचा कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या प्रकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण शिक्षा टाळण्यासाठी आरोपी अनेकदा अशा प्रकारचा आजार असल्याचं भासवतात असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे.

close