अखेर येडियुरप्पा राजीनामा देण्यास तयार

July 28, 2011 12:43 PM0 commentsViews: 3

28 जुलै

लोकायुक्तांनी अहवाल सादर केल्यांनतर, चोवीस तासांच्या आत येडियुरप्पांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. तसं पत्र त्यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे पाठवलं. पण त्यासाठी त्यांनी अनेक अटी घातल्या आहेत. त्यांना स्वतःच्या मर्जीतला उत्तराधिकारी हवाय आणि स्वतःसाठी प्रदेशाध्यक्षपदही हवंय. नव्या मुख्यमंत्र्याची निवड उद्या बंगलोरमध्ये होणार आहे. अखेरीस येडियुरप्पांची घटिका आता भरली. न्यायमूर्ती हेगडेंच्या अहवालात खाणसम्राटांकडून लाच घेतल्याचा ठपका ठेवल्यानंतर त्यांची खुर्ची जाणं निश्चित झालं आहे. पण त्याआधी ते बुधवरी रात्री दिल्लीत आले. आणि गुरुवार पहाटेपर्यंत गडकरींसोबत वाटाघाटी करत होते. शेवटी त्यांनी गुरुवारी संध्याकाळी हायकमांडला कळवलं की ते पक्षाच्या आदेशाचे पालन करतील. पण येडियुरप्पांचा राजीनामा घेणं काही इतकं सोपं नव्हतं. हेगडेंचा अहवाल सादर झाल्यानंतरही. पुढचे दोन वर्षं मीच मुख्यमंत्री राहणार असं ते म्हणत होते. आगदी शेवटपर्यंत त्यांनी खुर्चीला चिकटून राहण्याचा प्रयत्न केला.

येडियुरप्पांची 'डील'

- जर लोकायुक्तांच्या अहवालानुसार कारवाई करण्याची वेळ आली तर पूर्ण सहकार्य मिळावे अशी मागणी येडियुरप्पांनी पक्षाच्या हायकमांडकडे केली- पक्षाच्या राज्यातल्या कारभारात निर्णायक भूमिका माझ्याकडेच राहावी अशी दुसरी महत्त्वाची मागणी- नवा मुख्यमंत्री माझ्याच सल्ल्यानुसार निवडण्यात यावा ही तिसरी मागणी

लोकायुक्तांच्या अहवालात ज्या इतर मंत्र्यांवर ठपका ठेवण्यात आला त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला असला तरी स्वतःच्या भविष्याची तरतूद करण्यात येडियुरप्पांना मात्र नक्कीच यश मिळालं.

येडियुरप्पा म्हणतील त्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवायला. भाजप हायकमांडने नकार दिला. पण येडियुरप्पांना आश्वासन देण्यात आलंय की त्यांच्या विरोधकाला हे पद दिलं जाणार नाही. आता कर्नाटकाच्या या नाटकाचा शेवटचा अंक शुक्रवारी खेळला जाईल. जेव्हा राज्याचा नवा मुख्यमंत्री निडवला जाईल.

close