महामोर्चाच्या व्यासपीठावर शिवसेनेची गर्दी ?

July 28, 2011 4:50 PM0 commentsViews:

28 जुलै

गिरणी कामगारांच्या हक्कांसाठीचा मोर्चा..हजारो गिरणी कामगारांचा सहभाग..मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गिरणी कामगारांच्या घोषणांचा आवाज घुमला. या मोर्चाला शिवसेना, मनसे, रिपाई या पक्षांचा पाठिंबा होता.

पण आझाद मैदानावर मोर्चा आल्यानंतर सगळं चित्रच बदलल्याचं दिसलं. शिवसेनेनं हा मोर्चा हायजॅक केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. कारण व्यासपीठावर गर्दी होती शिवसेनेच्या नेत्यांचीच. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे, मनोहर जोशी यांच्यासह शिवसेनेचे इतरही काही चेहरे व्यासपीठावर दिसले.

close