सलमानचा खरा ‘बॉडीगार्ड’ सिनेमात

July 28, 2011 12:59 PM0 commentsViews: 4

28 जुलै

बॉडीगार्ड सिनेमाच्या निमित्ताने सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा सध्या चांगलाच लाईमलाईटमध्ये आला. सिनेमाच्या फर्स्ट लूक लाँच केल्यानंतर शेरा आता सिनेमातल्या एका गाण्यातही दिसणार आहे.

एकेकाळी बॉडीगार्डचा वापर सेलिब्रिटी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी करत पण आता सेलिब्रिटीचं बॉडीगार्ड बनून आपल्या समोर येत आहे. सलमानचा आगामी सिनेमा बॉडीगार्डच्या निमित्ताने गुरमित सिंग उर्फ शेरा हा सलमान खानचा रिअल लाईफमधला बॉडीगार्ड सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सलमान खानने शेराला लाईमलाईटमध्ये आणलं. नुकतचं शेराने बॉडीगार्डचे फर्स्टलूकही लाँच केलं होतं. आणि आता तर तो सगळया मीडियाला मुलाखतही देतोय.

पण आम्ही हे काय ऐकतोय. शेराचं फेम इतकचं नाही तर शेरा सलमान खानसोबत बॉडीगार्डमध्ये एका आयटम नंबरमध्येही थिरकताना दिसणार आहे."BEING HUMAN"मुळे सलमान नेहमीचं चर्चेत राहिला. पण आता बॉडीगार्डनंतर त्याने त्याचा मेकअप आर्टीस्ट आणि ड्रायव्हरला प्रमोट केलं तर आश्चर्य वाटायला नको.

close