धोणीला लोकप्रिय क्रिकेटर पुरस्कारासाठी नामांकन

July 28, 2011 5:01 PM0 commentsViews: 3

28 जुलै

भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचं आयसीसीच्या लोकप्रिय क्रिकेटर पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. या पुरस्कारासाठी धोणीची स्पर्धा असेल ती लंकन कॅप्टन संगकारा, वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल, इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला यांच्याशी.

2010-11 मधील कामगिरीवरुन ही नामांकनं जाहीर झाली. धोणीच्या कप्तानी खाली यावर्षी भारताने वन डे वर्ल्ड कप जिंकला. आयसीसीचा हा एकमेव पुरस्कार आहे जिथं क्रिकेट फॅन्स पुरस्कार विजेता निवडतात.

आयसीसीच्या वेबसाईटवर जाऊन या पुरस्कारासाठी मत नोंदवता येईल. गेल्यावर्षी पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला. आणि पहिला पुरस्कार जिंकण्याचा मान सचिन तेंडुलकरने पटकावला होता.

close