भारत – इंग्लंड दुसर्‍या टेस्टसाठी उद्या आमने सामने

July 28, 2011 1:34 PM0 commentsViews:

28 जुलै

इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये भारतीय टीमसाठी सुरुवात खराब झाली. पण गेल्या दोन वर्षात अनेकदा पहिली टेस्ट गमावल्यावर भारतीय टीमने कमबॅक केलं. आणि भारतीय टीमनेही उमेद सोडली नाही हे प्रॅक्टिस सेशनमध्येल्या त्यांच्या बॉडी लँग्वेजवरुन लक्षात येत होतं. झहीर या टेस्टमध्ये खेळणार नाही हे नक्की झालं. दुसरीकडे इंग्लंडच्या टीमनेही सीरिज जिंकण्याचा निर्धार केलेला दिसतोय.

भारतीय टीम मागच्या आठवड्यात बसलेल्या धक्क्यानंतर खडबडून जागी झाली असेल अशी अपेक्षा करुया. बॅटिंग, बॉलिंग आणि अगदी फिल्डिंगमध्येही इंग्लंडच्या टीमने त्यांना मागे टाकलं. पण पहिली टेस्ट गमावल्यावर सीरिजमध्ये कमबॅक करायचीही भारतीय टीमला आता सवय झाली. त्यामुळे टीममधला सगळ्यात नवखा खेळाडू अभिनव मुकुंदच्या बोलण्यात एकप्रकारचा आत्मविश्वास जाणवतोय.

दुसरीकडे ट्रेंटब्रिजमध्ये इंग्लंडचं मुख्य अस्त्र असणार तो म्हणजे जेम्स अँडरसन. लॉर्ड्सवर पाच विकेट घेत त्याने आपला फॉर्म आधीच दाखवून दिला. आणि त्यातच ट्रेंटब्रिज मैदान तर त्याच्यासाठी नेहमीच लकी आहे. या मैदानावर आतापर्यंत सोळा रनच्या ऍव्हरेजने 28 विकेट घेतल्यात. शिवाय अँडरसनला सचिन तेंडुलकरबरोबरचं त्याचं द्वंद्वंही पुढे सुरु ठेवायचंय. आतापर्यंत पाच टेस्टमध्ये त्याने सचिनला सहावेळा आऊट केलं.

इंग्लंडचा फास्ट बॉलर ख्रिस ट्रेमलेटला छोटीशी दुखापत झाली. पण दुसर्‍या टेस्टसाठी तो फिट असेल. तर भारतीय टीममध्येही सचिन आणि गंभीरच्या फिटनेसचा प्रश्न सुटला आहेत. दोघंही दुखापत आणि आजारपणातून सावरले आहेत.

close