पुण्यात गावठी दारुच्या अड्‌ड्यावर पोलिसांचा छापा

July 28, 2011 2:07 PM0 commentsViews: 6

28 जुलै

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात गावठी दारुच्या अड्‌ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 48 हजार लीटर दारू नष्ट केली. सेक्टर 12 मधील दारुच्या अड्‌ड्यावर हा छापा टाकण्यात आला. काल रात्री नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मळीचे टँकर्स पकडले होते.

या टँकर्सच्या मालकाचा शोध घेत पोलीस या अड्‌ड्यापर्यंत पोहचले. घातक रसायने वापरुन दारु बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ही सर्व दारु नष्ट केली. मात्र या अड्‌ड्याचा मालक आपल्या सर्व कर्मचार्‍यांसह पळून जाण्यात यशस्वी झाला. वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असणारा या अड्‌ड्याकडे पोलिसांनी इतके दिवस दुर्लक्ष का केलं असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहेत.

close