झहीर दुसर्‍या कसोटी सामान्यातून आऊट

July 28, 2011 1:56 PM0 commentsViews: 54

28 जुलै

ट्रेंटब्रिजमध्ये होणार्‍या दुसर्‍या टेस्टसाठी भारतीय टीमचे सराव सत्र काल पार पडले. सगळ्यांचे लक्ष अर्थातच झहीर खानवर होतं. आणि तो प्रॅक्टिससाठी हजर असला तरी त्याने बॉलिंग मात्र केली नाही. प्रॅक्टिस पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सना त्याने सह्या दिल्या. प्रॅक्टिसनंतर लगेचच कॅप्टन धोणीने तो खेळणार नसल्याचं जाहीर केलं. लॉर्ड्स टेस्टमध्ये हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे तो बॉलिंग करू शकला नव्हता. गेल्या अनेक वर्षांपासून झहीर भारताचा मुख्य बॉलर आहे. त्याच्या दुखापतीमुळे भारताला लॉर्ड्स टेस्टमध्ये मोठी किंमत मोजावी लागली होती.

close