अण्णांना उपोषण स्थळ बदलण्याची सूचना

July 29, 2011 9:48 AM0 commentsViews: 2

29 जुलै

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारेंना उपोषणाचे स्थळ बदलण्याची सूचना करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,दिल्ली पोलिसांनी पत्रद्वारे अण्णांना सूचना केल्याचे समजतं आहेत. पण अण्णांनी अजूनही या पत्राला उत्तर दिलं नसल्याचं समजतंय. पण सरकारची ही दडपशाही आहे. आणि या विरोधात हायकोर्टात जाण्याचा इशाराही अण्णांनी दिलाय.

काल केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकपाल विधेयकाचा मसुदा मंजूर केला.लोकपालाच्या अधिकार क्षेत्रातून पंतप्रधान आणि न्यायसंस्थेला बाजूला ठेवण्यात आलं. पंतप्रधानांनी पद सोडल्यानंतरच त्यांची लोकपाल चौकशी करू शकतील. सरकारच्या या निर्णयावर अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली.

सरकारने संपूर्ण जनतेची फसवणूक केली आहे आता आरपारची लढाई करण्याचा निर्धार अण्णा हजारेंनी केला. 16 ऑगस्टपासून जंतरमंतरवर उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारेंनी जाहीर केलं आहेत. मात्र आता दिल्ली पोलिसांनी अण्णांना उपोषण स्थळ बदलण्याचे पत्र पाठवण्यात आलं आहे.

close