चंद्रपूरमध्ये मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या हत्येमुळे तणाव

July 28, 2011 2:22 PM0 commentsViews: 3

28 जुलै

मनसेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. माजरी परिसरातल्या एका बिअर बारसमोर भरदिवसा ही हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

मनसे कार्यकर्त्यांनी चंद्रपूर यवतमाळ हा महामार्ग रोखून धरला. संतप्त कार्यकर्त्यांनी दहा ट्रक्स जाळले तर पाच एस टी बसेस फोडल्यात. मनसे कार्यकर्त्यांनी काही वेळापूर्वी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात पाच पोलीस जखमी झाले आहेत. सध्या या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

सूर यांचा मृतदेह वरोरा उप जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. या हॉस्पिटलच्या परिसरातही मनसे कार्यकर्त्यांनी तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी वरोरा शहर बंद केलं असून पोलिसांनी वरोरामध्येही जमावबंदी लागू केली आहे. माजरी आणि वरोरा इथं दंगल नियंत्रण पथकं तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, सहा जणांवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close